जुलै सप्टेंबर तिमाहीत 'रेकॉर्ड ब्रेक' स्मार्टफोन्स विक्री

25 Oct 2019 11:52:15


 


नवी दिल्ली : २०१९ जुलै-सप्टेंबर तिमाहीत ४.९ कोटी इतक्या स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक मंदीच्या वातावरणाला पूर्णपणे झुगारत ग्राहकांनी यंदा स्मार्टफोन्सची भरपूर खरेदी केली आहे. काऊंटरपॉईंट या संशोधन अहावालानुसार, कंपनीच्या ब्रॅण्डस् आणि दिवाळी ऑफर्समुळे ही विक्री झाली आहे.

 

'शाओमी' ठरला अव्वल

या अहवालानुसार, शाओमी हा सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन्स ब्रॅण्ड ठरला आहे. भारतीय बाजारपेठेत एकूण २६ टक्के हिस्सा शाओमीने मिळवला आहे. २० टक्के सॅमसंग, १७ टक्के विवो, रिअलमी १६ टक्के आणि ओप्पो ८ टक्क्यांसह पाचव्या स्थानी आहे. आयफोन 11 च्या सादरीकरणानंतर अॅप्पल सर्वाधिक मागणी असलेल्या फोन्सच्या यादीत पहिल्या १० स्मार्टफोन्समध्ये पोहोचला आहे. या तिमाहीत वन प्लस हा प्रिमीअम ब्रॅण्ड म्हणून लोकप्रिय बनला आहे.

 

फिचर फोन्सच्या विक्रीत घसरण

फिचर फोन्सच्या विक्रीत ३७ टक्के घसरण झाली आहे. रिलायन्स जिओतर्फे नवा फिचर फोन बाजारात न आणल्याने ही घसरण झाल्याचे या काऊंटरपॉईंटच्या अहवालात म्हटले आहे. आयटेल, लावा आणि कारबन आदी फिचरफोन्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आहे.

Powered By Sangraha 9.0