दीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी...

    दिनांक  25-Oct-2019 11:43:45
|


मधु मंटेना दिग्दर्शित ‘महाभारत’ या चित्रपटांच्या मालिकेमध्ये दीपिका द्रौपदीची भूमिका साकारणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. दीपिकाने आत्तापर्यंत रामलीला,पद्मावत अशा चित्रपटांमधून घरंदाज स्त्रियांच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पण त्यापेक्षा आणखी एक वेगळी कलाकृती आगामी चित्रपटातील ‘द्रौपदी’ च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे ही तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक आनंदाची बाब असेल.

शिवाय महाभारतासारख्या एका ऐतिहासिक चित्रपटात दीपिकाला काम करण्यासाठी संधी मिळाल्यामुळे तिच्याकडे प्रेक्षकांचे लक्ष असेलच. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ‘महाभारत’ या आगामी चित्रपटासाठी ती आणखी एक भूमिका साकारणार आहे ती म्हणजे निर्मात्याची. त्यामुळे निर्माती म्हणून देखील ती किती यशस्वीपणे काम करू शकते हे पाहणे देखील या चित्रपटाच्या निमित्ताने महत्वाचे ठरेल.

दरम्यान ‘महाभारत’ या चित्रपटाची कथा अतिशय हटके असून ती द्रौपदीच्या दृष्टीकोनातून कथित होणार आहे हे देखील दिपिकासाठी एक नवीन आव्हान असेल. पुढील वर्षी दिवाळीत या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित होईल अशी माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली. सध्या दीपिका मेघना गुलजार यांच्या ‘छपाक’ या चित्रपटाच्या कामामध्ये व्यस्त आहे.