येमेनमधल्या बालकांचे काय?

    दिनांक  25-Oct-2019 21:24:06   
|
जगाच्या पाठीवर असेही काही देश आहेत, जिथे धर्माच्या नावावर माणसाच्या आजही कत्तली होत आहेत. त्या कत्तलींना वैश्विक साद-प्रतिसादही मिळत आहे. पण तरीही त्या कत्तली बंद होत नाहीत की, त्याबद्दलचे सत्य जगासमोर सर्व आयामांनुसार प्रकट होत नाही. त्यापैकीच एक देश येमेन.भारताला दहशतवाद नवा नाही
. तैमूर, गजनी, खिलजी, औरंगजेब, निजाम ते टिपू सुलतान सगळ्यांनीच आपापल्या परीने धर्माच्या नावावर स्थानिकांना पार कुस्करून टाकले होते. इंग्रजाचा बेरकीपण स्लो मोशन धर्मवादासोबतच सत्तामाजही भारताने सहन केलेलाच आहे. तर सांगायचा मुद्दा हा की, भारत या सगळ्या दहशतवादाला पुरून उरत आहे. मात्र, जगाच्या पाठीवर असेही काही देश आहेत, जिथे धर्माच्या नावावर माणसाच्या आजही कत्तली होत आहेत. त्या कत्तलींना वैश्विक साद-प्रतिसादही मिळत आहे. पण तरीही त्या कत्तली बंद होत नाहीत की, त्याबद्दलचे सत्य जगासमोर सर्व आयामांनुसार प्रकट होत नाही. त्यापैकीच एक देश येमेन.जगभर अल्लाचे राज्य आणायचे आहे
, म्हणत जगाला वेठीस धरणारे येमेनमध्येही आहेत. दहशतवाद माजवणारे खरे मानवतेला काळिमा फासत असतात. मात्र, आव असा आणतात की, त्यांची ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांच्या सांगण्यानुसारच ते करत आहेत. वरवर पाहता जगभर दहशतवादाची संकल्पना अशीच मांडली जाते, पण सगळ्या जगाला माहिती आहे की, धर्मसंकल्पना वगैरे वगैरे काही नसून हा फक्त सत्ता संपादनासाठीचा लढा असतो. ज्यात साम-दाम-दंड-भेद वापरून सत्ताच हस्तगत करायची असते. येमेन एक गरीब मुस्लीम राष्ट्र. आजूबाजूला तेलाने खाऊन पिऊन माजलेली अरब राष्ट्रे आणि या राष्ट्रांच्या भाऊगर्दीत कुपोषण, सततचे गृहयुद्ध यामुळे मेटाकुटीस आलेले येमेन राष्ट्र. येमेन म्हणजे आमेनचा अपभ्रंश, असे काही लोकांचे म्हणणे. आमेन म्हणजे शुभविधान केल्यावर तथास्तु म्हणणे. पण येमेनची सध्याची परिस्थिती पाहिली की, वाटते येमेन किंवा आमेन सध्या आमेन आणि अमनपासून कोसो दूर आहे.मुस्लीम ब्रदरहूडचा नारा आपल्याला खिलापत चळवळीच्या थेरापासून माहिती आहे
. असेच थेर एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही रोहिंग्या मुस्लिमांसाठी मुंबईत केले होते. त्यांची हिंसा तर निंदनीयच. तर असो, विषयांतर नाही. हे सगळे सांगण्याचा मुद्दा हाच की मुस्लीम ब्रदरहूड म्हणणार्‍यांनी येमेनबद्दल जरूर माहिती घ्यावी. येमेनची गणना अरबी राज्यांत होते. यामुळे साहजिकच मुस्लीम धर्माची इथे सुगी आहे. आजूबाजूची राष्ट्रेही मुस्लीमधर्मीय. त्यामुळे या देशामध्ये धर्मासंबंधी लढा वगैरे असायलाच नको, असा भाबडा समज असू शकतो. मात्र १९६३ मध्ये येमेनमध्ये क्रांती झाली. तिथे रशिया आणि मिस्त्रच्या सहकार्याने गणराज्य स्थापन केले. फुटीरतेची ठिणगी इथेच पडली.येमेनमध्येही हौती म्हणजे अल्लाचे समर्थक म्हणून फुटीरतावादी तयार झाले
. असे येमेन सरकारचे आणि त्या सरकारला मदत करणार्‍यांचे म्हणणे आहे. हे फुटीरतावादी मुस्लीममधील जैदी शिया पंथाचे आहेत. हौती हे त्या पंथातील अल्पसंख्याक, येमेनच्या सीमाभागात राहणारे. यांनी हौती नावाची संघटना स्थापन केली. ही संघटना हुसैन बद्रद्दुनी अल हुती यांच्या नावावरून. विद्रोह केला म्हणून हुसैन हुती यांचा येमेन सेनेद्वार खातमा करण्यात आला होता. त्यांच्या नावावरून त्यांच्या समर्थकांनी हौती नावाची संघटना काढली. येमेन किंवा इतर अरबी राष्ट्र सुन्नि बहुल. सुन्नी मुस्लिमांचा तथाकथित जिहाद तर सर्वश्रूत डोकेदुखी. या सुन्नी जिहाद पासून प्रेरणा घेऊन शिया अल्पसंख्यकांनी हौती संघटना स्थापन केली. आमचा पंथ, आमच्या श्रद्धा श्रेष्ठ असे त्यांचे म्हणणे. अर्थात त्यासाठी हिंसाचार करणे, सरकारशी दररोजचे गृहयुद्ध छेडणे हे आलेच. मुस्लीमविरुद्ध मुस्लीम असे युद्ध येमेनमध्ये सुरू आहे.या युद्धामध्ये हाल होताहेत मात्र निष्पापांचे
. युनिसेफच्या इथल्या प्रतिनिधी सारा बेंसोलो न्यातचा अहवाल आहे की, येमेनमधल्या अंतर्गत हिंसक युद्धामुळे ५ लाख बालकांनी शिक्षण घेणे सोडले आहे. तसेच युनिसेफच्याच अहवालानुसार येमेनमध्ये २० लाख बालके कुपोषित आहेत. कुपोषण, गरिबी, युद्धाची छाया याचा भयंकर परिणाम या बालकांवर होत आहे. त्यात भर म्हणून की काय केवळ जगण्यासाठी म्हणून हजारो बालके फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी होत आहेत. सुन्नी शियावाद आणि धर्मवेडात नाडली जाणारी येमेनची जनता. येमेनच्या बालकांचे काय?