'महा'राष्ट्रासाठी कोणतंही नवं समीकरण स्वीकारणार - रोहित पवार

24 Oct 2019 15:28:07




अहमदनगर : विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर येत आहेत. निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट होत आले आहे. राज्यातील लक्षवेधी लढतीपैकी एक असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्यातील लढत आहे. शिंदे हे भाजपचे मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेते होते. परंतु, प्रत्येक फेरीचे निकाल जसे समोर येऊ लागले तसा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. कालपासूनच रोहित पवार आणि अजित पवार यांच्या विजयाबद्दल अभिनंदनाचे बोर्ड मतदारसंघात झळकले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारादरम्यान ढवळून काढलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये नेमके काय चित्र असेल, याबाबत संपूर्ण राज्यात प्रचंड उत्सुकता आहे.

 

पक्षांतरामुळे गाजलेल्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला



नगर शहर विधानसभा मतदार संघातून एकविसाव्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप १०९४० मतांनी शिवसेनेचे अनिल राठोड यांचा पराभव केला.
शेवगाव-पाथर्डी मतदार संघातून भाजपच्या मोनिका राजळे यांचा १४ हजार मतांनी विजयी झाला आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून २४०० मतांनी घनश्याम आण्णा आघाडीवर आहेत. राहुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे हे २२ हजार ६०० मतांनी विजयी घोषित करण्यात आले त्यांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला. शिर्डी मतदार गृहमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सलग सातव्यांदा विजयी झाले. 

Powered By Sangraha 9.0