पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक कसब्यातून विजयी

    दिनांक  24-Oct-2019 12:58:55
|




पुणे : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कसबा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांचा विजय निश्चित झाला आहे. राष्ट्रवादीचे अरविंद शिंदे यांचा पराभव केला आहे.. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांचा २७ हजार मतांनी पराभव केला. टिळक कुटुंबातील वारसदार असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने या मतदारसंघातून मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली होती.


गेल्या २५ वर्षांपासून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून पुण्याचे खासदार गिरीष बापट हे सलग पाचवेळा निवडून आले होते. १९९५ पासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. पण मे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर पुण्यातून विजय संपादन केला होता. 
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपला मानणारा पारंपरिक मतदार मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा फायदा मुक्ता टिळक यांना या निवडणुकीत झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेचे विशाल धनवडे यांनी मतदारसंघातून बंडखोरी केली होती. पण त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे पाहायला मिळाले.