मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वांद्रे विधानसभा मतदार संघातून तब्बल ५,३६४ मतांनी पराभव झाला आहे. काँग्रेसचे झीशान सिद्दकी यांचा याठिकाणी विजय झाला आहे. मातोश्रीच्या मैदानातच महापौरांचा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागणार आहे.
तृप्ती सावंत यांची बंडखोरी शिवसेनेला महागात पडली असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. वरळीतून आदित्य ठाकरे हे मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत. तर शिवडी मतदारसंघातूनही शिवसेना आघाडीवर आहे. पण वांद्रे येथील हा निकाल शिवसेनेला विचार करायला भाग पाडणार आहे.