प्रशांत ठाकूर यांची आमदारकीची हॅट्रीक

24 Oct 2019 11:53:54


 


पनवेल : भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि पनवेल विधानसभा मतदार संघाचे उमेदवार प्रशात ठाकूर यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यांनी तब्बल ९१ हजारांचे मताधिक्य मिळवले आहे. हरेश केणी हे शेकापचे उमेदवार त्यांच्या विरोधात उभे होते. मात्र प्रशांत ठाकूर यांच्या विकासकामांना पनवेलच्या जनतेने कौल दिला आहे. त्यांना १ लाख ७७ हजार ८१ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधात उभे असलेल्या हरेश केणी यांना ८५ हजार ५६४ मते मिळाली आहेत.   

 

पनवेल हा सर्वात जास्त मतदार संख्या असलेला मतदार संघ मानला जातो. त्यादृष्टीकोनातून लोकसंख्येला सगळ्या नागरी सोयीसुविधा पुरवणे, पाण्याचा प्रश्न सोडवणे, हे आव्हान प्रशांत ठाकूर यांच्यासमोर होते. सिडकोच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून भूमिपुत्रांचे प्रश्न मांडणे, नवी मुंबई विमानतळ आणि प्रकल्पग्रस्तांचा हक्काचा माणूस अशी ओळख त्यांची या मतदार संघात आहे.
 

सिडकोच्या कामातूनही या भागात विकासाचे नवीन आयाम मिळाले. नियोजित विमानतळ परिसरात तरुणांना स्थानिक रोजगार मिळावा म्हणूनताराही संस्था सिडकोने सुरू केली. युवकांचे कौशल्य विकास, विमानतळाशी संबंधित १४ विविध अभ्यासक्रम ९५ गावांत या संस्थेने सुरू केले आहेत. इनक्युबेशन सेंटर्सच्या माध्यमातून युवकांना लहानमोठे उद्योग सुरू करण्यासाठी मदत करणे आदी कामांमुळे मतदारांनी एकूणच त्यांच्या पारड्यात आपली मते टाकून त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.

Powered By Sangraha 9.0