कहो दिलसे अतुलजी फिरसे ! : अतुल भातखळकर २१ हजार मतांनी आघाडीवर

24 Oct 2019 11:23:49
 
 
 

मुंबई : भाजपचे अभ्यासू आमदार, अशी ओळख असलेले कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे उमेदवार यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे. सलग दहाव्या मतमोजणी फेरीनंतर ते कायम आघाडीवर राहिले आहेत. त्यांनी एकूण २१ हजार २२८ मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे अजंता यादव उभे आहेत. गेल्या पाच वर्षातील कांदिवली विधानसभा मतदार संघातील त्यांच्या विकासकामांचा धडाका पाहता जनतेने पुन्हा एकदा त्यांच्या पारड्यात मते टाकली आहेत.

 

अतुल भातखळकर यांनी निवडणूकीचा प्रचारही एकहाती सांभाळला होता. 'कहो दिलसे अतुलजी फिरसे', ही टॅगलाईन त्यांनी आपल्या मतदारसंघात प्रचारीत केली होती. डिजिटल प्रचाराद्वारे आपल्या मतदार संघातील युवा मतदार वर्गापर्यंत पोहोचण्याचे कौशल्यही त्यांनी दाखवले होते. घरोघरी जाऊन प्रचार प्रसार करण्यावरही त्यांनी भर दिला होता. मतमोजणीच्या दिवशी पहिल्या फेरीपासूनच भातखळकर आघाडीवर होते. तिसऱ्या फेरीतच त्यांनी दहा हजार मतांचा टप्पा पार केला होता. तर कॉंग्रेसचे उमेदवार यादव तिसऱ्या फेरीतही केवळ तीन हजार मते मिळाली होती.

Powered By Sangraha 9.0