'दबंग ३' च्या ट्रेलरमधील पोलिसवाला आलाय प्रेक्षकांच्या भेटीस

    दिनांक  23-Oct-2019 18:23:46
|


 

एक होता है पोलिसवाला...एक होता है गुंडा...और हम है पोलिसवाला गुंडा...! असे म्हणून अतिशय ग्रँड एन्ट्री घेत प्रेक्षकांच्या लाडक्या चुलबुल रॉबिनहूड पांडे अर्थात 'दबंग ३' सलमान खानने आज प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये घेतली.

सलमानचा विशेष टच असणारे गाणे, सोनाक्षी सिन्हाची अदा, साई मांजरेकरच्या सरळ-सुंदर भूमिकेची झलक या सगळ्या गोष्टींनी भरलेला असा हा नवीन ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. "कोई 'दबंग' पैदा नही होता, उसके पीछे भी कहानी होती है" असा जबरदस्त डायलॉग ट्रेलरमध्ये आहे. त्यामुळे अधिप्रमाणेच या आगामी चित्रपटातील डायलॉग प्रेक्षकांना वेड लावणार असे दिसत आहे.

प्रभू देवा दिग्दर्शित 'दबंग ३' चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमधील औत्सुक्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यामध्ये यशस्वी सुद्धा झाले आहेत. आता २० डिसेम्बरला प्रेक्षकांची ही आवड बॉक्स ऑफिसवरील अंकांवर कशी उमटते हे पाहणे मात्र खूपच महत्वाचे आणि औत्सुक्याचे असेल.