'बायपास रोड' चित्रपटाचा रहस्यमय प्रोमो प्रदर्शित

    दिनांक  23-Oct-2019 14:45:26
|


निल नितीन मुकेश मुख्य भूमिकेत असलेल्या 'बायपास रोड' या आगमीची चित्रपटाचा प्रोमो व्हिडीओ आज प्रदर्शित झाला. या रहस्यमय व्हिडीओमध्ये निल नितीन मुकेश अपंग असून त्याला एक मुखवटा घातलेला माणूस मारायला येत असताना दिसत आहे. आता या मुखवट्यामागे कोण आहे? निल नितीन मुकेश चा खून करण्याचा कोण प्रयत्न करत आहे? का आणि कशासाठी? असे अनेक प्रश्न हा प्रोमो बघताना प्रेक्षकांना पडू शकतात.

या प्रोमोमध्ये चित्रपटाच्या रहस्यमय कथेची एक छोटी झलक दिसत असून अंगावर काटा आणणारा असा हा ट्रेलर आहे. निल नितीन मुकेशसाठी ही भूमिका किती अवधानात्मक आहे याचा अंदाज हा प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांना येऊ शकेल.

नमन नितीन मुकेश दिग्दर्शित 'बायपास रोड' येत्या १ नोव्हेंबर ला प्रदर्शित होणार आहे त्यामुळे आता या चित्रपटात नेमके कोणते रहस्य उलगडते हे पाहणे खूपच औत्सुक्याचे असेल.