ईव्हीएमबाबत अफवा पसरविणे पडले महागात

    दिनांक  23-Oct-2019 17:15:31
|

सातारा
: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसह महाराष्ट्रातील सातारा विभागातील पोटनिवडणुका घेण्यात आल्या. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान
, ईव्हीएमध्ये बिघाड झाला असून कोणतेही बटन दाबल्यास कमळालाच मत जाते आहे, अशी अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादीच्या पोलिंग एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पोलिंग एजंटने अशी अफवा पसरविली होती की
, त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला दिलेले मत भाजपाच्या उमेदवाराला आपोआप जात आहे. पोलिंग एजंटची ओळख दीपक रघुनाथ पवार अशी असल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. तो सातारा जिल्ह्यातील नवलेवाडी गावचा रहिवासी आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना दिले गेलेले मत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या खात्यात जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला होता. निवडणूक अधिकार्यांनीही हा दावा फेटाळला. कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे रिटर्निंग अधिकारी किरण नलावडे म्हणाले की." इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बदलण्यात आले ते याच नवलेवाडी मतदारसंघात आहे. मशीन बदलणे हा दुसर्‍याला मत जाण्याच्या दाव्याशी संबंधित नाही. मतदान केंद्राचे अधिकारी व सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जी.जी.गायकवाड यांनी पवार यांच्याविरूद्ध पुसेगाव येथे तक्रार दाखल केली आहे.


एका पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार
,"पवारांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ (१ ) बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा लोकसभा जागा २१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती.उद्या या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.