चिदंबरम यांचा जामीन मंजूर, 'इडी'ची टांगती तलवार मात्र कायम

22 Oct 2019 11:58:48



चिदंबरम यांना एक लाख रुपयांसह सशर्त जामीन मंजूर


नवी दिल्ली: देशाचे माजी अर्थमंत्री व आयएनएक्स घोटाळ्यातील आरोप पी. चिदंबरम यांचा जामीन अखेर मंजूर करण्यात आला आहे. आज २२ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालय चिदंबरम यांच्या जामीनअर्जावर अंतिम निकाल देणार होते.


आयएनएकस मिडीया घोटाळयाप्रकरणी चिंदबरम यांना 'सीबीआय'ने २१ ऑगस्ट रोजी अटक केली होती. काही दिवस सीबीआय कोठडीत घालवल्यावर चिदंबरम यांची रवानगी बिहारच्या तिहार जेलमध्ये करण्यात आली होती. 'सीबीआय'च्या वतीने देशाचे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. चिदंबरम यांची बाजू कपिल सिब्बल यांनी मांडली. न्या. एस. बोपण्णा, न्या. आर. बानुमती आणि न्या. हृषीकेश राय यांच्या न्यायपिठासमोर चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. चिदंबरम यांचा जामीन अखेर मंजूर करण्यात आला आहे. एक लाख रुपये व दोन जामीनदार अशा अटींसह जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान इडी कडून सुरू असलेल्या चौकशीतून दिलासा मिळणार का , यावर प्रश्नचिन्ह आहे. 
Powered By Sangraha 9.0