#BharatKiLaxmi : यंदाचे लक्ष्मीपूजन करा भारतकन्येच्या सन्मानाने...

    दिनांक  22-Oct-2019 15:51:27
|


 


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी 'भारत की लक्ष्मी' हे अभियान चालवणार असल्याचे 'मन की बात'मध्ये सांगितले होते. यानिमित्त सध्या सोशल मीडियावर एक व्हिडियो वायरल होत आहे. दिवाळीनिमित्ताने त्यांनी देशवासीयांना 'सेल्फी विथ डॉटर'च्या धर्तीवर 'भारत की लक्ष्मी' अभियान चालवण्याचे आवाहन केले. या व्हिडियोमध्ये पी.व्ही.सिंधू, दीपिका पदुकोण आणि सिंधुताई सपकाळ यांचा समावेश आहे.

 
 
 

'आपल्या कुटुंबात, समाजात अशा अनेक मुली असतील ज्या त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याने देशाचे नाव उज्वल करतात. या दिवाळीत अशा लक्ष्मींचा सन्मान करूया. 'भारत की लक्ष्मी' असा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर फोटो अपलोड करून त्यांचा सन्मान करूया.' आशा आशयाचा संदेश या अभियानाच्या व्हिडियोमध्ये देण्यात आला आहे. या व्हिडियोमध्ये पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने आपलेसे करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि भारताची 'फुलराणी' पी.व्ही सिंधु या दोघीही 'भारत की लक्ष्मी' अभियानाचे प्रचार करताना दिसत आहेत.