जेष्ठ नागरिक मतदारांची 'हि' प्रेरणादायी उदाहरणे, [जरूर वाचा]

    दिनांक  21-Oct-2019 20:42:27
मुंबई, दि. 21 (प्रतिनिधी):  

कांदिवलीत ९० वर्षाच्या बेघर आजीचे मतदान
कांदिवली पूर्व भीमनगर येथील वयोवृध्द हरीबाई तुकाराम मकरंद या ९० वर्षाच्या आजीने मतदान करत आपला हक्क बजावला. विशेष म्हणजे या आजीबाई बेघर आहे. 1980 पासून वनखात्याच्या जागेवर राहणाऱ्या आजीबाईनी हक्काच्या घरासाठी अनेक नेत्यांकडे पायपीट केली. पण त्यांच्या वाट्याला अपयश आले. घरात कोणीही कर्ता पुरुष नाही. अठराविश्व दारिद्र्य असतांनाही त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानी दाखविलेल्या उत्साहाबदल अनेकांनी आजीचे कौतुक केले.


मतदान आमचा हक्क
मतदान हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही बजावणारच, असे मोठ्या ठसक्यात प्रेमलता शेणॉय या 78 वर्षीय आजीनी आणि त्यांच्या मैत्रीणीने सांगितले. दिंडोशी मतदार संघातील सन्मित्र शाळा मतदान केंद्रावर त्या मतदानासाठी आल्या होत्या.(दिंडोशी मतदार संघातील गोरेगावच्या सन्मित्र शाळा मदन केंद्रात," मतदान हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही बजावणार आणि बजावला" असे सांगणाऱ्या 78 वर्षीय प्रेमलता शेनॉय आणि त्यांच्या मैत्रीण)

एक वोट भी किमती है
एक वोट भी किमती है| अच्छा उम्मीदवार को धोका नही पहुचना चाहिए इसलिए वोट देने आयी हूँ, असे दहिसरमध्ये 81 वर्षांच्या आजीबाई तुलसी त्रिवेदी यांनी सांगितले.


(दहिसरमध्ये 81 वर्षांच्या आजी तुलसी त्रिवेदी योग्य उमेदवार निवडून येण्यासाठी मतदान करून बाहेर पडल्यानंतर)