मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य : सरसंघचालक

    दिनांक  21-Oct-2019 11:00:43नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी आज मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील महालच्या भाऊजी दप्तरी शाळेत जाऊन सकाळी ७ वाजता मतदान करून आपला हक्क बजावला. यावेळी 'मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.' असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

"लोकशाहीला मजबूत करण्याकरता प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. तसेच, मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यासाठी लोकांनी घराबाहेर पडून आपला हा हक्क बजावला पाहिजे. दर ५ वर्षांनी प्रतिनिधी निवडून देणे हेही मतदाराचे राष्ट्रीय कर्तव्य आहे." असे सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणाले.