जामखेडमध्ये भाजप कार्यकर्त्यावर चाकू हल्ला

    दिनांक  21-Oct-2019 17:33:48
 

जामखेड : मतदानाला जात असताना भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर हल्ल्यामध्ये झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. भाजपचे दोन कार्यकर्ते यात जखमी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्याच्या संतापात भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यकत्यांच्या वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी पाच जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

 

जामखेड तालुक्यात बांधखडक या गावी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते भालेराव हिरालाल वनवे (वय २८), हर्षवर्धन शंकर कुंदे (वय २२) हे दोघे मतदानासाठी जात होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नाकावर हल्ला केला. तसेच हातावरही धारदार शस्त्राने वार केले. यात दोघेही जखमी झाले असून त्यांना जामखेड रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, यामुळे तणाव वाढल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.