महायुती सुसाट; महाआघाडी सपाट!

    दिनांक  21-Oct-2019 20:59:02

मुंबई
: राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार येणार असल्याचे संकेत सोमवारी मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोल (मतदानोत्तर) चाचण्यांमधून स्पष्ट झाले. सर्व वृत्तसंस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजप-शिवसेनेचीच सत्ता येणार असल्याचा आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सुपडा साफ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये राज्यात भाजप-शिवसेना महायुतीला २३०, काँग्रेस आघाडीला ४८ आणि इतरांना १० जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचाच आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.