झारखंडच्या या खेळाडूचे कसोटीत पदार्पण

    दिनांक  19-Oct-2019 12:54:23नवी दिल्ली : शनिवारी भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. त्यापूर्वी, भारत २-० अशी मालिका जिंकली असून विराटसेनेचा निर्धार ३-० अशी मात देण्याचा निर्धार असेल. दरम्यान, भारताचा चायनामन कुलदीप यादवला दुखापत झाल्यामुळे झारखंडच्या शाहबाज नदीमला संधी देण्यात आली आहे. यामुळे झारखंडच्या आणखी एका खेळाडूचे कसोटीमध्ये पदार्पण झाले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारा शाहबाज नदीम २९६ वा खेळाडू ठरला.

 

भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. इशांत शर्माच्या जागी शाहबाज नदीमचा संघात समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी अचानक कुलदीप यादवच्या खांद्यात दुखापत झाल्याने त्याला पर्याय म्हणून शाहबाज नदीमला बोलावण्यात आले. फिरकीपटू असलेला शाहबाज नदीमने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे.

 

शाहबाज नदीमची कामगिरी

 

शाहबाजने एका रणजी हंगामा ५० पेक्षा जास्त विकेट घेण्याची कामगिरी दोनवेळा केली आहे.

 

झारखंडकडून खेळात असलेल्या शाहबाज नदीमने ११० प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ४२४ बळी टिपले आहेत