तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत डीआरडीओने केले ३० करार

19 Oct 2019 10:51:14


डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने १६ भारतीय कंपन्यांबरोबर तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी ३० करार केले आहेत. यामध्ये ३ स्टार्ट अपचा समावेश आहे. गोव्यात १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान आयोजित व्हायब्रंट गोवा जागतिक प्रदर्शन आणि शिखर परिषदे दरम्यान हे करार करण्यात आले.

डीआरडीओ सशस्त्र दलांसाठी तंत्रज्ञान विकसित करते आणि ते संरक्षण उद्योगाकडे हस्तांतरीत केले जाते.


भारतीय सशस्त्र दलांना संरक्षण क्षेत्रातल्या या उद्योगांकडून
‘रेडी टू इट जेवण’, तसेच लहरी हवामानात तग धरण्यासाठी भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांना ही उत्पादने उपयोगी पडतात. या उत्पादनांचे पोषण मूल्य उच्च दर्जाचे असून, अनेक महिने टिकते.


भारताने गेल्या काही वर्षात
'मेक इन इंडिया' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानाला अधिकाधिक चालना मिळावी यासाठी अनेक उपक्रम सुरु केले. सरकारने त्यासाठी संरक्षण क्षेत्रातील उपकरणांपासून ते सामान्य नागरिकांच्या रोजच्या वापरातल्या वस्तूंपर्यंत अनेक वस्तूंचे उत्पादन भारतात बनवण्यासाठी प्रोत्सहन दिले. या उपक्रमांना देशातच नाही तर बाहेरच्या देशातून सुद्धा मोठा पाठिंबा मिळाला. ही सर्वांसाठीच एक अभिमानास्पद गोष्ट आहे.

Powered By Sangraha 9.0