चंद्राच्या पृष्ठभागाचे 'हे' सुंदर छायाचित्र तुम्ही पाहिले का ?

18 Oct 2019 11:04:14


 

बंगळुरू : इस्त्रोने चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्वात सुंदर असे छायाचित्र प्रदर्शित केले. चंद्राच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या सुर्यप्रकाशाचे मोजमाप करणारे संयत्र म्हणजेच इमॅजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर पेलोडवरून चंद्राचे छायाचित्र घेण्यात आले आहे. गुरुवारी इस्त्रोने हे छायाचित्र ट्विट करत ही माहिती दिली आहे.



 

 

२२ जुलै रोजी इस्त्रोचे चांद्रयान २ हे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅण्डींग करणार होते. मात्र, शेवटच्या क्षणी इस्त्रोशी संपर्क सुटला. चांद्रानाची हार्ड लॅण्डींग चंद्राच्या पृष्ठभागावर झाली होती. त्यामुळे नासाशी संबंध तुटला. चांद्रयान २ बरोबर पाठवण्यात आलेले ऑरबिटर हे चंद्राच्या कक्षेत अजूनही भ्रमण करत आहे.

Powered By Sangraha 9.0