‘इफ्फी’ मधील 'सुवर्ण मयुर पुरस्कार' स्पर्धेसाठी "या" चित्रपटांची निवड

18 Oct 2019 15:08:59


 

इफ्फीगोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट माईघाट आणि मल्याळम चित्रपट जलीकट्टू हे दोन चित्रपट भारतातर्फे 'सुवर्ण मयुर पुरस्कार' स्पर्धेसाठी निवडण्यात आले आहेत. २० देशांचे १५ चित्रपट ईफ्फी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत.

दरम्यान गोव्यात आयोजित होणा-या ५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये यावर्षीचे ४१ सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात ६ मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले आहे.

इफ्फीचे हे ५० वे वर्ष असून २० ते २८ नोव्हेंबर २०१९ दरम्यान, या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. ७६ देशांचे एकूण २०० चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होणार असून इंडियन पॅनोरमा या मानाच्या विभागात ५ फिचर आणि १ नॉन फिचर असे एकूण ६ मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

इंडियन पॅनोरमात २६ फिचर आणि १५ नॉन फिचर असे एकूण ४१ भारतीय भाषांतील चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावर्षी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या भारतीय चित्रपटांची या विभागात निवड करण्यात आली आहे.

Powered By Sangraha 9.0