पुढील १० वर्षात देशातील गरिबी पूर्ण हटणार ; जागतिक बँकेचा अंदाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2019
Total Views |


वॉशिंग्टन
: संपूर्ण देशात मंदीसदृश्य वातावरण असताना जागतिक बँकेने आशादायी भाकीत वर्तविले. येत्या १० वर्षात देशातील गरिबी पूर्ण हटणार ,असे भाकीत जागतिक बँकेने केले. जागतिक बँकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सोबत होणाऱ्या वार्षिक बैठकीपूर्वीच जागतिक बँकेने भारताबाबत हे महत्वपूर्ण वक्तव्य केले. जागतिक पटलावर प्रतिनिधित्व करत असताना भारताने देशातील दारिद्र्य निर्मूलन, पर्यावरण, सौरऊर्जा यांसारख्या महत्वपूर्ण विषयांवर प्रभावी भूमिका बजावली, त्यामुळे यासर्व बदलांसह विकासाच्या मार्गावर वाटचाल करणारा भारत हा महत्वपूर्ण देश आहे, असे जागतिक बँकेने म्हणले.

१९९० नंतर गरिबीबाबतच्या भारताच्या स्थितीत अधिक सुधारणा झाली. या काळात देशातील गरिबीचा दर निम्म्याहून कमी झाला आहे. गेल्या १५ वर्षात भारताने ७ टक्क्यांहून अधिकचा विकासदर गाठला आहे. मानव विकासाच्या संदर्भातही देशाने मागील १५ वर्षात बरीच प्रगती केली आहे. एकूणच परिस्थिती पाहता विकासदर आणि गरिबी निर्मूलनाचे लक्ष गाठत असताना देशाने अशीच प्रगती केल्यास पुढील एका दशकात देशातील गरिबी पूर्णपणे हटविण्यात देशाला यश मिळेल, असे जागतिक बँकेचे म्हणणे आहे.
हे म्हणत असतानाच देशाला आर्थिक संसाधनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठीचा सल्लाही जागतिक बँकेने दिला. याबरोबरच शहरी क्षेत्रामध्ये सामुदायिक अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेच्या विकासावर लक्ष देऊन जमिनीच्या योग्य वापरावर भर द्यावा असा सल्लाही दिला.
@@AUTHORINFO_V1@@