डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात 'व्हायब्रंट गोवा' परिषदेचे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2019
Total Views |


 
 

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच व्हायब्रंट गोवा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि.१७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बांबोळी येथील डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी स्टेडीअम या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पुढील तीन दिवस सुरू असणाऱ्या या कार्यक्रमाला जगभरातून सुमारे अडीच हजार प्रतिनिधींचा सक्रीय सहभाग या परिषदेत असणार आहे, अशी माहिती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. या परिषदेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.




 

 

'व्हायब्रंट गोवा फाऊंडेशन'तर्फे ही परिषद भरवण्यात येणार असून गतवर्षापासूनच यासाठीची सर्व तयारी सुरू करण्यात आली होती. दोनशेहून अधिक स्टॉल्स, प्रदर्शनी, चर्चासत्र आदी विविध उपक्रम या दरम्यान राबवले जाणार आहेत. गोवा सरकारतर्फे या परिषदेला दोन कोटींची मंजूरी दिली आहे. या परिषदेमुळे देशविदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यश मिळेल, असा विश्वास डॉ. प्रमोद सावत यांनी व्यक्त केला. वर्षभरातच नव्या उद्योगांची कवाडे खुली होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असेही ते म्हणाले.




मनोहर पर्रिकर यांचे स्वप्न सत्यात

देशभरातील ३० ठिकाणी रोड शो, १७ देशांमध्ये जनजागृती करण्यात आली. परिणामी एकूण ५२ देशांतील प्रतिनिधींनी सहभाग घेण्यासाठी नोंदणी केली आहे. गोव्यात अशा प्रकारची परिषद व्हावी, अशी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांची इच्छा होती, अशी आठवण डॉ. सावंत यांनी सांगितली. यासाठी एकूण १० कोटींच्या निधीची आवश्यकता होती. राज्यातर्फे दोन कोटींचा निधी मंजूर केला असून उर्वरित निधी आयोजकांनी उभा केल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.




 

@@AUTHORINFO_V1@@