पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या सूचनेने राजीव धवन यांनी नकाशा फाडला : डॉ.वेदांती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2019
Total Views |




नवी दिल्ली
: श्रीराम जन्मभूमी न्यासाचे सदस्य डॉ. रामविलास दास वेदांती यांनी सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील राजीव धवन यांनी सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमीचा नकाशा फाडल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. राजीव धवन यांना मुस्लिम मंडळाच्या बाजूने केस लढण्यासाठी दहशतवाद्यांकडून निधी उपलब्ध असल्याचा आरोप त्यांनी केला. आता त्यांना आपला निधी बंद होण्याचा धोका असल्यानेच ते असे करत आहेत. त्याचा पराभव झाला असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.


वेदांती म्हणाले की
, "रामजन्मभूमीचा नकाशा फाडणे ही बाब निषेधार्ह आहे. मी या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला होता पण राममंदिराच्या बाजूने घेतलेला निर्णयात अडथळा येऊ नये म्हणून मी एफआयआर दाखल करणार नाही."


ते म्हणाले की
, "सर्वोच्च न्यायालयाने ७० वर्षे प्रलंबित या खटल्याची सुनावणी ४० दिवसात पूर्ण केली आहे. म्हणाले की बाबरच्या नावावर काहीही नाही, जे काही आहे ते भगवान श्री राम यांच्या नावावर आहे." त्याचवेळी कॉंग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले की, "कॉंग्रेसने जनतेला ७० वर्षे वाट पाहायला लावली.अयोध्येत राम मंदिर बांधून हे प्रकरण मिटवले पाहिजे, अशी कॉंग्रेसची इच्छा नाही. देशातील ९५ टक्के मुस्लिमांना देखील अयोध्येत राम मंदिर हवे आहे."

@@AUTHORINFO_V1@@