बीडच्या भूमीने देशाला महाजन-मुंडेंसारखे महान नेते दिले : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2019
Total Views |



परळी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात दिवसभरात तीन सभा होणार आहेत. गुरुवारी परळीतील सभेत बीडच्या भूमीने गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन, असे दोन नेते देशाला दिले आणि त्यांच्या रुपात मला दोन मित्र मिळाले, अशा भावना व्यक्त केल्या. या दोन्ही नेत्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कायम कमळाला साथ दिली. यावेळी सर्व विक्रम मोडतील, असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.

 

कलम ३७० वरून सरकारची खिल्ली उडवणाऱ्यांची इतिहासात नोंद होईल, असा टोलाही त्यांना लगावला. ३७० हे राजनीतीमुळे नाही तर देशनीतीमुळे हटवले, असे ते म्हणाले. आमच्या महायुतीच्या पाच वर्षांच्या कामांमुळे जनशक्ती आमच्याकडे आहे. विरोधक, जे लोक थकले आहेत ते तुमचे काम करू शकतील का?, मग त्यांना का मत द्यायंच?, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. तरुण आणि सळसळत्या रक्ताची मजबूत टीम महायुतीच्या पाठीशी उभी आहे. विरोधकांकडून लोक आता भाजपकडे येत आहेत. हे पाहून विरोधकांना घाम फुटला असेल, धाप लागत असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

@@AUTHORINFO_V1@@