अयोध्या सुनावणी : न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्स अथॉरिटीचे प्रसारमाध्यमांना सल्लागारपत्रक

17 Oct 2019 17:21:44




नवी दिल्ली
: न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्स अथॉरिटीने (एनबीएसए) टीव्ही वृत्तवाहिन्यांमधील अयोध्या प्रकरणाची या  होत असलेली चर्चा पाहता 'खबरदारी' घेण्याचा सल्ला दिला आहे. एनबीएसएने सर्व वृत्तवाहिन्यांना या संदर्भात सल्लागारपत्रक जारी केले आहेत.


‘भडकावू
वादविवाद' टाळण्याचा सल्ला

रामजन्मभूमी-बाबरी मशिदी प्रकरणात 'भडकाऊ वादविवाद' टाळण्यास सांगितले आहे. बाबरी मशीद पाडण्याचे फुटेज न वापरण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. दोन पानांच्या निर्देश पत्रकात असे म्हटले आहे की, "याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी सद्य कार्यवाहीबाबत अनुमान सांगणारे कोणतेही प्रसारण करण्यात येऊ नये."


बातमी दाखवण्यापूर्वी तथ्य तपासा

अयोध्या प्रकरणातील प्रत्येक बातमी ही बातमीदार व संपादकाने तथ्य तपासल्याशिवाय प्रसारित करू नये. प्रसारित होणाऱ्या बातमीत अशीच तथ्ये असावीत जी कोर्टाकडे पुरावा म्हणून सादर झालेली आहेत. किंवा त्या बातमीदाराने स्वतः रेकॉर्ड केलेली आहेत.


निषेधात्मक फुटेज दाखविण्यावर बंदी

सल्लागारात असेही म्हटले आहे की, अयोध्या प्रकरणाबद्दल लोक निषेध करत आहेत किंवा तोडफोड करत आहेत असे फुटेज दाखवू नये. तसेच बातम्या किंवा प्रोग्राममध्ये पक्षपात दर्शवू नये. चर्चासत्रामध्ये किंवा इतर कोणत्याही मार्गाने कोणालाही आक्षेपार्ह मते नोंदविण्याची संधी मिळणार नाही याची खात्री वाहिन्यांनी करायला हवी.




 

Powered By Sangraha 9.0