कलम ३७० हटवण्याला आमचा विरोध नाही : मनमोहन सिंह

17 Oct 2019 15:26:58



मुंबई : कलम ३७० हटवण्याला आमचा विरोध नाही, असे वक्तव्य माजी पंतप्रधान व कॉंग्रेस नेते मनमोहन सिंह यांनी केले आहे. कलम ३७० हे काश्मीरच्या जनतेला दिलासा देणारे आहे, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारने ज्या प्रकारे या कलमाची अंमलबजावणी केली त्याला आमचा विरोध असल्याचे ते म्हणाले.

 

कॉंग्रेस ही सावरकरविरोधी नसून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, असेही ते म्हणाले. मात्र, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमचे मतभेत आहे, असेही ते म्हणाले. भाजपतर्फे जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा पाठपुरावा केला जाणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर मनमोहन सिंह यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कॉंग्रेस कार्यालयात मनमोहन सिंह यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. पंजाब-महाराष्ट्र कॉ. ओपरेटिव्ह बॅंकेच्या ग्राहकांशीही त्यांनी यावेळी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली.

Powered By Sangraha 9.0