खुशखबर : समोर आला चंद्राचा पहिला प्रकाशमान फोटो

17 Oct 2019 19:51:10



नवी दिल्ली : इस्रोच्या चांद्रयान - २ मोहिमेसंदर्भात एक आनंदाची बातमी आहे. यानाने चंद्राच्या पृष्ठभागाचे पहिले प्रकाशमान छायाचित्र पाठवले आहे. इस्रोने ट्विटकरात या फोटोबद्दल माहिती दिली. हा फोटो चंद्राच्या उत्तर गोलार्धाचा आहे. याआधीही चांद्रयान - २ने चंद्राचे काही फोटो पाठवले होते. आता चंद्राच्या पृष्ठभागाचे हे फोटो अत्यंत सुस्पष्ट आणि प्रकाशात घेतलेले आहे. चांद्रयान - २ चंद्राचा थ्रीडी नकाशाही तयार करणार आहेत. चांद्रयान - २ ने २० ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता.

 
 
 

चांद्रयान - २ चे विक्रम लँडरला फोटो पाठवण्यात अपयश आले. परंतु, चांद्रयान - २ मधील अत्याधुनिक आयआयआरएस पेलोड यंत्रणेमुळे हे शक्य झाले. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किमी दूर असताना या लँडरचा इस्रोसी संपर्क तुटला. त्यानंतर लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आता मात्र चांद्रयान - २ च्या ऑरबिटरने चंद्राची फोटो पाठवले आहेत.

Powered By Sangraha 9.0