नुसते राजीनामे देणाऱ्यांना कायमचे घरी बसवा : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2019
Total Views |



अजित पवारांच्या राजीनामा नाट्यावर मुख्यमंत्री म्हणतात...



मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात आला असून रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी वेगाने झाडल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात जाऊन थेट अजित पवारांनाच आव्हान दिले आहे. जनतेच्या पैशांवर, साखर कारखान्यांवर आणि बॅंकांवर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट नेत्यांना घरी बसवा, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

 

भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गोपिचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटूंबियांवर घणाघात केला. मुख्यमंत्री म्हणाले, "जे लोक ईडीची चौकशी राज्य सरकारने लावली, असे आरोप करत आहेत, त्यांनी स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे, ते आधी पाहावे. स्वतः सत्तेत असताना केलेल्या भ्रष्टाचारामुळे चौकशीचा फेरा त्यांचा मागे लागला आहे. साखर कारखान्यातील जनतेचे पैसे बुडवून तेच कारखाने कवडीमोल भावाने विकत घेत भ्रष्टाचार ज्यांनी केला. ते आज मगरीचे अश्रू लढत आहेत."

 

अजित पवारांच्या राजीनामा नाट्यावरही त्यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले, "अजित पवारांनी राजीनामा देत राजकारणातून सन्यास घेण्याचे जाहीर केले होते. सकाळी राजीनाम्याची घोषणा करणारे अजित पवार सायंकाळी शरद पवारांची भेट घेत पुन्हा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. अशा व्यक्तींना तुम्हीच घरी बसवा.", असे आवाहन त्यांनी जनतेला केले. पवारांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी पडळकरांसारखा ढाण्या वाघ आपला उमेदवार, असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

@@AUTHORINFO_V1@@