प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे अग्निहोत्र मालिकेचे नवीन रूप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2019
Total Views |


 


आजवर आभाळमाया
, असंभव, अग्निहोत्र अशा काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केले. त्याच आठवणींना उजाळा देत तब्बल १० वर्षानंतर प्रेक्षकांना अग्निहोत्रची रहस्यमय कथा आता एका नवीन रूपात पाहायला मिळणार आहे. 'अग्निहोत्र २' या नवीन मालिकेची घोषणा नुकतीच करण्यात आली असून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. दरम्यान पूर्वीच्या अग्निहोत्र मालिकेने प्रेक्षकांना वेड लावले होते आता या नवीन भागात कोणते रहस्य उलगडणार हे पाहणे खूपच औत्सुक्याचे ठरेल. तसेच 'अग्निहोत्र २' मधील कलाकारांविषयी सुद्धा चर्चा रंगल्या असून त्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

'अग्निहोत्र २' च्या तयारीला सुद्धा जोरदार सुरुवात झाली आहे. या मालिकेचे प्रसारण स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवर होईल. 'अग्निहोत्र' च्या पहिल्या पर्वांप्रमाणेच या पर्वाचीही कथा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक श्रीरंग गोडबोले करणार आहेत. अग्निहोत्र २चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आणि या टीझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे अग्निहोत्र २ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

@@AUTHORINFO_V1@@