अनंतनागमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2019
Total Views |


श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या पजलपोरा आणि अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान, या चकमकीत एक सैनिक जखमी झाला आहे. चकमक थांबल्यानंतर जवानांनी या परिसराची तपासणी सुरू केली आहे. दहशतवादविरोधी कारवाईत या ठिकाणचे पोलीस, सैनदल आणि सीआरपीएफच्या जवानांनी एकत्र येत मोहीम उघडली आहे.

 

दहशतवादी या ठिकाणी लपून बसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू केली होती. दहशतवादी मोठा कट घडवण्यासाठी एकत्र येत होते. याबद्दल माहिती मिळताच तिन्ही दलाच्या जवानांनी संयुक्तपणे मोहीम सुरू केली. घराघरात जाऊन तपासणी सुरू केल्यावर एका घरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र, चकमकीत तीन अतिरेकी मारले गेले. दरम्यान, या गोळीबारात एक जवान जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@