दाऊदच्या सहकाऱ्याशी व्यवहार : प्रफुल पटेल यांना ईडीचे समन्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहेत. दाऊदच्या सहकाऱ्याशी व्यवहार केल्या प्रकरणी त्यांची ईडीतर्फे चौकशीही केली जाणार आहे. १८ ऑक्टोबर रोजी प्रफुल्ल पटेल यांची मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. दाऊदचा सहकारी ईकबाल मिर्ची याच्याशी संपत्ती व्यवहार प्रकरणी चौकशी केली जाणार आहे.

 

ईकबाल मिर्ची याचा २०१३ मध्ये मृत्यू झाला होता. ईडीकडे असलेल्या पुराव्यानुसार प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी वर्षा यांच्यातर्फे सुरू असलेल्या एका कंपनीत दाऊद इब्राहिमचा सहकारी ईकबाल याच्या मालकीच्या जमिनीवर १५ मजली इमारत बांधण्यात आली. ईकबाल मिर्ची हा आंतरराष्ट्रीय अपराध सिंडिकेट चालवत होता. मुंबई आणि दुबई या ठिकाणाहून तो काम पाहत होता.

 

दरम्यान, प्रफुल पटेल यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. मात्र, ईडीच्या म्हणण्यानुसार, दुबईतील एक पंचतारांकीत हॉटेल खरेदी करण्यासाठी ईकबालचा साथीदार युसूफ याने पैसे पाठवले होते. मुंबईतील प्रमुख ठिकाणी त्याने ट्रस्टच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात पैसे गुंतवले होते. रंजित सिंह बिंद्रासोबत अटक केली.



 

@@AUTHORINFO_V1@@