'मुंबई सीबीओ कोअर कमिटी' (नियोजित समिती) आयोजित प्रशिक्षण वर्ग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Oct-2019
Total Views |



'स्वच्छ भारत अभियान'अंतर्गत सर्वेक्षण २०१९ सुरू झाले आहे. यानिमित्ताने मुंबईतील वस्ती सामुदायिक शौचालयांच्या सर्व कम्युनिटी बेस ऑग्नायझेशनचे प्रशिक्षण होणे गरजेचे वाटल्याने 'मुंबई सीबीओ कोअर कमिटी' यांच्यावतीने मुंबईच्या विविध भागात कार्यरत असणाऱ्या सीबीओंचे दोन दिवसीय प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन, या ठिकाणी घेण्यात आले होते. त्याचा हा आढावा


सीबीओंचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी 'मुंबई सीबीओ कोअर कमिटी' लासंपूर्ण सहयोग देणाऱ्या 'माय ग्रीन सोसायटी'चे प्रमुख सुशील जाजू त्याचप्रमाणे विशाल टिबरेवाल, 'केशवसृष्टी'च्या सचिव सुचित्रा इंगळे, 'युनिसेफ'च्या 'वॉश' या कार्यक्रमाचे अधिकारी आनंद घोडके, माजी पालिका साहाय्यक आयुक्त आणि 'माय ग्रीन सोसायटी'चे पदाधिकारी साहेबराव गायकवाड, वस्ती सामुदायिक शौचालय व सीबीओ संकल्पनेचे जनक आनंद जगताप (ओएसडी-बृमुंमनपा) यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली. सुचित्रा इंगळे, आनंद घोडके, आनंद जगताप, सुशील जाजू, साहेबराव गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

 

सुरुवातीस आनंद जगताप यांनी उपस्थितांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे महत्त्व सागितले. त्यांनी सांगितले की, कशाप्रकारे मुंबई महापालिकेने १९९७ साली सुरू केलेल्या वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत आजतागायत ८०० पेक्षा अधिक वस्ती सामुदायिक शौचालयांची बांधणी केली. त्यानंतर या शौचालयांना स्थानिक स्तरावरील मूलभूत काम करणाऱ्या सामाजिक संघटनाना (सीबीओ) व्यवस्थापन करण्यासाठी हस्तांतरण करण्यात आले. शौचालयाच्या स्वच्छतेच्या मााध्यमातून ८०० हून अधिक सीबीओ, मुंबई झोपडपट्टीतील १८ लाख लोकसंख्येपर्यंत पोहोचले आहेत. पुढे ते म्हणाले की या सर्व सीबीओंनी एका व्यासपीठावर येऊन समाजाच्या विविध प्रश्नांवर काम करण्याची गरज निर्माण झाली आहे, यावेळी सुशील जाजू म्हणाले की. सीबीओसारख्या अराजकीय घटकासोबत काम करायला मिळते आहे, याचा अभिमान वाटतो. मुंबईमध्ये सीबीओसारखा स्वच्छतेच्या क्षेत्रात वर्षानुवर्षं कार्यरत असणारा घटक दुर्लक्षित राहिला, हे स्वच्छ भारतासाठी अभिनंदनीय नाही. यासाठी 'माय ग्रीन सोसायटी' सीबीओच्या सदैव पाठीशी राहील आणि सीबीओ घटकाला अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करेल. तर विशाल टिबरेवाल यांनी 'माय ग्रीन सोसायटी' सदैव सीबीओ कोअर कमिटीच्या पाठीशी आहे, असे सांगताना अशी प्रशिक्षण कार्यक्रमांची साखळी तयार व्हावी आणि भविष्यात येणाऱ्या अनेक सीबीओंपर्यंत प्रशिक्षण कार्यक्रम पोहोचविण्यासाठी साथ-संगत करण्याची तयारी दाखविली.

 

सुचित्रा इंगळे यांनी 'केशवसृष्टी'त समाजातील तळागाळात आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सीबीओंचे प्रशिक्षण प्रथमच होत आहे. असे प्रशिक्षणाचे कार्यक्रम अनेकानेक होत राहण्यासाठी मी स्वत: सर्वोतोपरी पुढाकार घेईन, असा शब्द दिला. आनंद घोडके यांनी 'युनिसेफ' जरी आंतरराष्ट्रीयस्तरावर कार्य करीत असली तरी ती भारतातल्या ग्रामीण तसेच शहरी भागातील स्वच्छतेसाठीदेखील तितकीच अग्रक्रम देते. सीबीओ संस्था प्रशिक्षणाच्यानिमित्ताने एकत्र आल्या आहेत. ही एकता टिकावी आणि प्रत्येक सीबीओला आर्थिक स्थैर्य यावे, यासाठी जिथे जिथे 'युनिसेफ'ची मदत लागेल, तिथे तिथे 'युनिसेफ' तुमच्या सोबत असणारा आहे. याला आश्वासन न समजता 'युनिसेफ'च्या कार्यक्रमाचा एक भाग समजून आम्ही आमची स्वच्छतेबाबतची भूमिका निभावणार आहोत. याबरोबरच सीबीओंचे प्रश्न सरकारी दप्तरी मांडण्यासाठी आम्ही सीबीओंसोबत असणार आहोत, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. साहेबराव गायकवाड यांनी सांगितले की, येत्या दि. १९ नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिन आहे, यानिमित्ताने 'माय ग्रीन सोसायटी' सीबीओंकडून करण्यात येणाऱ्या शौचालय व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्यांचे कौतुक व्हावे, म्हणून भरघोस बक्षिसं असलेली उत्कृष्ट सीबीओ व शौचालय पुरस्कार - २०१९ ची घोषणा त्यांनी केली.

 

या प्रशिक्षणादरम्यान पुढील विषयांचे मार्गदर्शन तज्ज्ञ मान्यवर व्याख्यात्यांकडून झाले.

 

)'लोकसहभाग आणि सीबीओ म्हणजे काय? त्याची व्याख्या आणि नगरराज बिल धोरणाशी सीबीओचा असलेला संबंध' यावर सामाजिक कार्यकर्ते सीताराम शेलार यांनी मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी सीबीओ म्हणजे लोकशाहीतील योजनांची तळागाळात काटेकोरपणे अंमलबजावणी करणारा शासनाचा शेवटचा दूत आहे, असे सांगतानाच सीबीओ म्हणजे लोकांच्या सुखदु:खात धावून जाणारा पहिला समाजसेवक आहे, असेही सांगण्यास ते विसरले नाहीत.

 

)केंद्र शासनाच्या स्वच्छतेच्या नव्या धोरणांनुसार शौचालयांच्या स्वच्छतेसोबत त्या शौचालयातून येणाऱ्या मैलाचे व्यवस्थापन का व कसे करायला हवे, त्याचे पर्यावरणातील महत्त्व काय? या विषयावर प्रवीण लवांडे, (मैला व्यवस्थापनतज्ज्ञ) यांनी उपस्थित सीबीओंना चित्रफितीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

 

)सीबीओ आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या दस्तावेजांची पूर्तता करताना कायद्याच्या अंगाने कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी, याबाबत सरकारी धोरणं आणि सामाजिक संस्था 'अधिनियम १८६० आणि १९५०' यांच्याबाबत विस्तृत माहिती करून देण्याबाबतीत शैलेश निपुंगे, (संस्था नोंदणी-कायदेशीर सल्लागार) यांनी आपले विचार मांडले.

 

)सीबीओंच्या आर्थिक सक्षमतेसाठी संस्थेचेे दस्तावेजीकरण करून त्यातून 'सीएसआर'सारख्या योजनांचा सीबीओ कशाप्रकारे लाभ घेऊ शकतात, याबद्दलचे मार्गदर्शन 'रिनोव्हेट इंडिया' या खाजगी फर्मचे संचालक अलोक कदम यांनी आपले प्रेझेन्टेशन दिले.

 

)आनंद जगताप यांनी स्वच्छ भारत अभियान, लोकसहभागात कार्यरत असलेल्या सीबीओ संघटन का महत्त्वाचे आहे ? जे नसल्याने सीबीओंना कोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे ? जर सीबीओचे संघटन अस्तित्वात आले, तर आपण समाजात काय बदल घडवू शकतो? याचे अनमोल मार्गदर्शन प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात केले.

 

)सुशील जाजू यांनी समारोपप्रसंगी 'माय ग्रीन सोसायटी' पर्यावरणात कार्य करताना प्लास्टिक निर्मूलनासाठीदेखील कार्य करीत आहे. अशा कार्यात सीबीओंची साथ मिळाल्यास 'स्वच्छ भारत अभियान' अधिक सुदृढपणे राबविण्यास मदत होईल. यासाठी सर्व सीबीओंनी 'माय ग्रीन सोसायटी'च्या कार्यात हातभार लावायला हवा. या उपक्रमातून 'माय ग्रीन सोसायटी' सीबीओंना आर्थिक लाभ देण्यास सदैव तयार असणार आहे, असा आपला सकारात्मक अभिप्रायदेखील नोंदविला.

 

दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी सुचित्रा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या प्रभातफेरीच्या निमित्ताने केशवसृष्टीतील निसर्गाचा मनमुराद आनंद सीबीओ प्रतिनिधींनी लुटला. यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राबाविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती सुचित्रा इंगळे यांच्याकडून देण्यात आली. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईतल्या विविध भागांतून ४६ पेक्षा अधिक सीबीओंचे प्रतिनिधी आपापल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. कोअर कमिटी सदस्यांकडून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीबीओचे अध्यक्ष मनोहर राजगुरू यांनी केले. दयानंद जाधव यांनी सोबत केली. कार्यक्रमाची सांगता कोअर कमिटीच्यावतीने 'माय ग्रीन सोसायटी', 'केशवसृष्टी' आणि 'रामभाऊ म्हाळगी' यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.

 

- दयानंद जाधव

@@AUTHORINFO_V1@@