निलेश राणेंचा शिवसेनेला इशारा : "वार तर समोरूनच करणार"

    दिनांक  14-Oct-2019 11:23:28


 


कणकवली : 'आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लाऊन काम करायचे आहे,' असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे धाकटे सुपूत्र व कणकवली भाजप उमेदवार नितेश राणे यांनी केले होते. त्यावर आक्षेप घेत त्यांचे थोरले बंधू व माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला सुनावले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी नितेश राणे यांचाही समाचार घेतला.

 
 
 

'आदित्य ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे,' असे वक्तव्य नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र, निलेश राणे यांनी यावर प्रतिक्रीया देताना 'निलेशच्या या वक्तव्याशी मी जराही सहमत नाही,' असे म्हटले. 'ज्या पक्षाने नारायण राणे यांना त्रास दिला. 'ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात संघर्ष केला, केसेस टाकल्या, त्यांना हे कदापि सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार,' असे परखड मत निलेश राणे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, या ट्विटमुळे राणे कुटूंबियांतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. एकेकाळी शिवसेनेचे कट्टर विरोधक मानले नितेश राणे यांनी मात्र, शिवसेनेबद्दल पुन्हा मवाळ भूमिका घेतली आहे.