" २०१४ ला आई म्हणाली होती, लोक घरी पाठवतील": सुप्रिया सुळे यांची कबुली

14 Oct 2019 14:45:17

 
 
'तू आणि तुझ्या बाबांनी आणि भावाने माझं ऐकलं नाही'
(प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे परांडा विधानसभा मतदार संघात भाषण करत होत्या. परंडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर राहुल मोते निवडणूक लढत आहेत. भाषणादरम्यान सुप्रिया सुळे यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. 

आमची आई कधीही राजकारणात सहभागी होत नव्हती असं सुप्रिया सुळे  मिसेस पवारांविषयी म्हणाल्या. तरीही प्रतिभा पवारांना राजकारणातील बरोबर कळत, असा  दावा त्यांनी केला आहे. 

सुप्रिया सुळे यांनी भाषण करताना अर्धा तास उलटल्यावर, आईची एक आठवण सांगितली. सुप्रिया सुळे यांनी भाषणात म्हटल्यानुसार, त्यांना आईने २०१४ साली सांगितलं होतं. " महागाई एव्हढी वाढली आहे. लोक तुम्हाला घरी पाठवतील." 'आम्हाला विरोधक लागत नाही , आमची आईच आम्हाला घरचा आहेर देत असते', असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. "तू आणि तुझ्या बाबांनी आणि भावाने माझं ऐकलं नाही, पाठवलं ना लोकांनी घरी", असं म्हणत ,याची आठवण आईने नुकतेच करून दिल्याचे सुप्रिया सुळे यांनी भाषणात सांगितले.

     
भूम-परांडाचा कांदा या सरकारला चालत नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला आहे.
 
Powered By Sangraha 9.0