भारतात मला स्वातंत्र्याची अनुभूती येते : दलाई लामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019
Total Views |



ऊना : तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी भारत-चीन संबंधात पहिल्यांदा प्रतिक्रीया दिली आहे. रविवारी चंडीगडमध्ये जाताना ऊना सर्कीट हाऊसमध्ये विश्रांतीसाठी थांबले होते. या दरम्यान उनाचे उपायुक्त संदीप कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भारत-चीन संदर्भात शि जिंगपिंग यांच्या दौऱ्यासंदर्भात पहिली प्रतिक्रीया दिली.

 

"भारतात राहिल्यानंतर मला स्वातंत्र्याचा अनुभव येतो. इथे मी निर्वासित म्हणून येतो मात्र, गेल्या साठ वर्षांपासून मला स्वातंत्र्यांची अनुभूती येते. २००१पासून आम्ही चीनकडे स्वातंत्र्याची मागणी करत नाही मात्र, आम्हाला आमचे अधिकार हवे आहेत. हे अधिकार आमच्या संस्कृती गरज आहे. त्यामुळे त्यांना वाचवणे आमचे कर्तव्य आहे."

 

भारत-चीन संबंधांवर प्रतिक्रीया देताना ते म्हणाले, "भारत-चीन संबंध दृढ होण्याची गरज आहे. दोन्ही देशांची सभ्यता ही जूनी आहे. दोन्ही देश आर्थिक निकषांवर महान आहेत. आशियातील शक्तीशाली राष्ट्र म्हणून जगात ओळख आहे." तिबेट स्वातंत्र्याबद्दल ते म्हणाले, "१९९४मध्ये आम्ही ठरवले होते कि स्वातंत्र्याची मागणी करणार नाही. आम्ही आमच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी काही अधिकार मागणार आहोत."

@@AUTHORINFO_V1@@