मध्यप्रदेशमध्ये कार अपघातात चार हॉकीपटूंचा मृत्यू

14 Oct 2019 10:50:37


 
 

होशंगाबाद : मध्यप्रदेशच्या होशंगाबादमध्ये सोमवारी सकाळी एका कार अपघातात चार राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटूंचा मृत्यू झाला. त्यापैकी तिघे गंभीर आहेत. होशंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ध्यानचंद ट्रॉफी स्पर्धेसाठी इटारसी येथून येत होते. होशंगाबादच्या राष्ट्रीय महामार्गानजीक ६९ रेसलपूर गावात ही दुर्घटना घडली. दरम्यान, या घटनेत कारचा चुराडा झाला आहे.

 
 
 
 



Powered By Sangraha 9.0