भारतीयांसाठी अभिमानास्पद ! अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार जाहीर

14 Oct 2019 15:38:27


 


ओस्लो : जागतिक दारिद्र निर्मूलनासाठी कार्यरत असणारे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. फ्रान्स अर्थतज्ज्ञ एस्थर डफ्लो आणि अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. एस्थर डफ्लो या बॅनर्जी यांच्या पत्नी आहेत. बॅनर्जी यांचा जन्म १९६१ मध्ये मुंबईत झाला. त्यांनी १९८८मध्ये हावर्ड विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली होती. कोलकत्ता विद्यापीठ आणि नेहरू विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.  



 

 

जगासमोर दारिद्र निर्मुलनाचे आव्हान आता आहे. मुळचे भारतीय असलेले अभिजीत बॅनर्जी सध्या अमेरिकेतील मेसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. यापूर्वी भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना हा मान मिळाला होता. बऱ्याच वर्षांनी भारतीय व्यक्तीला हा सन्मान मिळाला आहे.

Powered By Sangraha 9.0