आज योगी आदित्यनाथ यांची तोफ धडाडणार!

    दिनांक  13-Oct-2019 20:38:51

 


नाशिक : सोमवार दि. १४ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाशिक येथे येत असून ते भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जनसभेस संबोधित करणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या राजकीय प्रचारात यंदा योगी आदित्यनाथ यांची तोफ धडाडणार आहे. ही सभा सोमवारी दुपारी ४ वाजता उत्तमराव पाटील स्टेडियम, पवननगर, सिडको येथे आयोजित करण्यात आली आहे.

 

यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खा. भारती पवार, खा. हेमंत गोडसे, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, नाशिक जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल ढिकले, राहुल आहेर, भाजप संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, काशिनाथ शिलेदार, उत्तमराव उगले, संभाजी मोरुस्कर, विजय साने, सुरेश बाबा पाटील, सुनील बच्छाव, प्रकाश घुगे, जगन पाटील, शिवसेना पदाधिकारी बबन घोलप, अजय बोरस्ते, विजय करंजकर, सचिन मराठे, रासपचे राजाभाऊ पोथारे, अरुण आव्हाड, आरपीआयचे प्रकाश लोंढे, शिवसंग्रामचे अमित जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

 

तरी नाशिक महानगरातील सर्वच विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते, शहर, मंडल व जिल्हा आघाड्यांचे पदाधिकारी, विस्तारक, नगरसेवक, शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमुख, पेजप्रमुख यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संमेलनाच्या आयोजन समितीतर्फे भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव व पवन भगूरकर यांनी केले आहे.