हिंदू संस्कृतीमुळे भारतातील मुस्लिम सर्वाधिक आनंदी : सरसंघचालक मोहनजी भागवत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2019
Total Views |



भुवनेश्वर : जगाच्या तुलनेत भारतातील मुस्लिम सर्वाधिक आनंदी आहेत. भारतातील हिंदू संस्कृतीमुळे केवळ मुस्लिमच नाही, तर इतर धर्मातील लोकांनाही भारतात आश्रय घ्यावासा वाटतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.

 

रविवारी विचारवंतांच्या बैठकीला डॉ. मोहनजी भागवत मार्गदर्शन करीत होते. भारतातील मुस्लिम सर्वाधिक आनंदी का आहेत? यामागचे कारण काय? याचे उत्तर एकच आहे, आम्ही हिंदू आहोत, या देशात हिंदू संस्कृती आहे. जेव्हा-जेव्हा जगाच्या पाठीवरील कोणताही देश संभ्रमात सापडतो आणि योग्य मार्गावरून भरकटतो, तेव्हा तेथील लोक सत्याचा शोध घेण्यासाठी भारतात येतात, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.

 

ज्यू लोकांना जेव्हा हुसकावून लावण्यात आले होते, तेव्हा त्यांना आश्रय देणारा भारत हाच एकमेव देश होता. पारसी जनताही या देशात आपल्या धार्मिक परंपरांचे पालन करीत, सुरक्षित नांदत आहेत, असे ते म्हणालेहिंदू हे कोणत्या भाषेचे, प्रांताचे किंवा देशाचे नाव नाही, तर ती एक संस्कृती आहे आणि ही संस्कृती भारतात वास्तव्य करणार्‍या सर्व नागरिकांना वारशाने लाभली आहे, असेही सरसंघचालकांनी सांगितले. भारतात परिवर्तन घडवून आणण्यासाठी केवळ हिंदूंनाच नव्हे; तर संपूर्ण समाजाला संघटित करण्याचा रा, स्व. संघाचा उद्देश आहे. समाजाला संघटित करण्याची आवश्यकता आहे आणि संघ त्या दिशेने काम करीत आहे. आमच्या मनात कुणाबद्दल द्वेष नाही.

 

एका चांगल्या समाजाच्या निर्माणासाठी आपल्याला एकत्रित पुढे जायला हवे. देशात परिवर्तन आणण्यासाठी आणि विकासासाठी हे करायलाच हवे. विचार आणि संस्कृती यांच्यात विविधता असूनही, भारतातील नागरिक स्वत:ला समान समजतात, असेही ते म्हणाले. भारतात एकतेचे दर्शन घडते. देशातील एकात्मतेमुळे मुस्लिम, पारसी आणि अन्य धर्माच्या लोकांना या देशात अधिक सुरक्षित वाटते. समाजात परिवर्तन घडवणारी आणि देशाचा कायापालट करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी चांगली माणसे आपल्याला घडवायची आहे, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@