जपानला 'हगिबिस'वादळाचा तडाखा ; मोदींनी व्यक्त केला शोक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2019
Total Views |



टोकियो : जपानची राजधानी टोकियो येथे सुपर टायफून हगिबिस वादळामुळे मोठी जीवित आणि वित्त हानी झाली. या वादळामुळे आत्तापर्यंत १४ जण ठार तर १६ जण जखमी झाले आहेत. तर १७ जण बेपत्ता आहेत. जपानी सरकारने आतापर्यंत एक लाख लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. जपानी मेटेरोलॉजिकल एजन्सीने (जेएमए) म्हटले आहे की,"शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) हागीबिस वादळाचा तडाखा बसला. तसेच जेएमए ने इबाराकी, तोचिगी, फुकुशिमा, मियागी आणि निगाता प्रदेशात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे, अशी माहिती सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली आहे. या वादळाच्या आदल्या दिवशी जपानमध्येही ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्याचे केंद्रबिंदू चिबा-केन प्रदेशात ८० किलोमीटर खोलवर नोंदले गेले होते. क्योडो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील अनेक नद्या ओसंडून वाहात आहेत. पूर, दरड कोसळलेल्या मध्य, पूर्व आणि ईशान्य भागात बचावकार्य सुरू आहे. जपानच्या होन्शु बेटाच्या मुख्य बेटावरील तब्बल सहा लाख लोकांना तेथून बाहेर काढण्याचा सल्ला देण्यात आला.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जपानमधील सुपर-टायफून हागीबिसमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि नैसर्गिक आपत्तींविरूद्ध लढा देण्यात सज्ज असलेल्या टोकियोचे कौतुक केले. "जपानमधील सुपर-टायफून हागीबिसमुळे झालेल्या जीवित हानीबद्दल मी सर्व भारतीयांच्या वतीने शोक व्यक्त करतो. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची लवकरात लवकर पूर्ववत व्हावी अशी माझी इच्छा आहे."


पुढे ते म्हणाले, "मला खात्री आहे की जपानी लोकांची सज्जता व लवचीकपणा आणि माझे मित्र अ‍ॅबेशिन्झो यांचे नेतृत्व या आपत्तीचा प्रभावीपणे सामना करतील. नैसर्गिक आपत्तींविरूद्ध जपानच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. या कठीण घडीला भारत जपानबरोबर आहे, असे मोदींनी ट्विट केले.

@@AUTHORINFO_V1@@