उरलेलं जेवण पार्सल मागितल्याने ग्राहकाला बेदम मारहाण; बारमालकासह ११ जणांना अटक

    दिनांक  12-Oct-2019 18:04:13

कल्याणच्या लीला बार मधील धक्कादायक प्रकार

डोंबिवली (प्रतिनिधी):   बिल दिल्यानंतर आपले उरलेले जेवण पार्सल मागणाऱ्या ग्राहकाला बारचालकासह ११ कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण लीला बार मध्ये घडली आहे .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात बारचालकासह ११ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.


कल्याण पश्चिम आधारवाडी चौक परिसरात लीला बार आहे . कल्याण मध्ये राहणारा विशाल पारेकर आपल्या दोन मित्रांसोबत बार मध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. रात्री सव्वा बाराच्या सुमारास बार मधील वेटर विशाल च्या टेबल वरील जेवण उचलून घेऊन गेला. विशाल ने बार मालक उमेश शेट्टी याच्याकडे याबाबत तक्रार केली. विशालने माझे जेवण मला पार्सल द्या नाहीतर माझ्या जेवणाचे पैसे मला परत करा असे सुनावले .त्यातून विशालची बारचालक व बार कर्मचाऱ्या मध्ये बाचाबाची झाली संतापलेल्या बारचालक व बार कर्मचाऱ्यानि विशाल ला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली .या मारहाणीत विशाल ला गंभीर दुखापत झाली असून . याप्रकरणी बारमालक उमेश शेट्टी सह बार मधील ११ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केले असता त्यांना कोर्टाने १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र या घटनेमुळे बारमध्ये कशाप्रकारे गुंडगिरी चालते हे पुन्हा एकदा समोर आले आहे.