मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघात ही बातमी चुकीची : केशव उपाध्ये

11 Oct 2019 19:07:07




महाड
: पेण येथे लँडिंग करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोडक्यात बचावले
, अशा आशयाच्या बातम्या दाखविल्या जात आहेत. वस्तुत: कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. लँडिंग करताना पायलट काळजी घेऊनच लँड करतात. मुख्यमंत्री नियोजित सर्व सभा पूर्ण करीत आहेत. त्याच हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री उल्हासनगर येथे रवाना झाले आणि तेथील सभाही त्यांनी केली. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवेवर, चुकीच्या माहितीवर कुणीही विश्वास ठेऊ नये, अशी माहिती भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.


आज पेणमधील सभेला गेले असता त्याठिकाणी चाक चिखलात रुतल्याने अपघात झाल्याचे वृत्त आहे. अहमदनगरमधील कर्जत याठिकाणची सभा संपवून मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पेण याठिकाणी सभा घेण्यासाठी पोहोचले. त्यानंतर त्यांनी पेण याठिकाणी प्रचारसभा घेतली व पुन्हा उल्हासनगरच्या सभेसाठी रवाना झाले.

Powered By Sangraha 9.0