राफेल शस्त्रपूजा : संरक्षणमंत्री म्हणतात, 'अलौकिक शक्तीवर आमचा विश्वास'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2019
Total Views |

 

नवी दिल्ली : राफेल शस्त्रपूजेप्रकरणी टीका करणाऱ्यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 'मी जे केले ते माझ्या दृष्टीने योग्यच होते. यापुढेही करेन. टीका करणारे करतील. हा आमच्या आस्थेचा विषय आहे. ब्रम्हांडात एक अलौकीक शक्ती आहे, यावर आमचा विश्वास आहे. लहानपणापासून माझ्यावर तसे संस्कार झाले आहेत. कुठल्याही धर्माच्या लोकांना त्यांच्या मान्यतेनुसार पूजा-प्रार्थनेचा अधिकार आहे. कॉंग्रेसची याबद्दल वेगळी मानसिकता आहे.', असा टोलाही त्यांनी लगावला.

 

राफेलवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांचे उत्तर मिळाले

राफेलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्यांना जनतेनेच त्यांचे उत्तर दिले आहे. मोदींविरोधात खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांना लोकसभेलाच मतदारांनी उत्तर दिले आहे, असे ते म्हणाले. भारताला एप्रिल-मे दरम्यान राफेल विमान मिळू शकेल, १८०० किमी प्रतितास धावणाऱ्या या विमानातून मी स्वतः १३०० किमी प्रतितास वेगाने उड्डाण केले, असा अनुभव त्यांनी व्यक्त केला.

 

फ्रान्स दौरा यशस्वी

राजनाथ सिंह म्हणाले, "फ्रान्स दौऱ्या दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्युअल मॅक्रॉन यांच्याशी ३५ मिनिटे चर्चा झाली. भारत आपल्या संरक्षणात कोणतिही तडजोड करणार नाही. राफेल वायुदलात सामाविष्ट झाल्यानंतर भारताचा संरक्षण क्षेत्रातील दबदबा आणखी वाढेल."

@@AUTHORINFO_V1@@