उत्कंठा वाढवणारा 'खारी बिस्कीट' चा ट्रेलर प्रदर्शित

11 Oct 2019 16:35:36



संजय जाधव दिग्दर्शित खारी-बिस्कीट या चित्रपटाचा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये खारी आणि तिचा भाऊ यांच्यातील नातं किती घट्ट आहे ते जाणवेल. आणि या आधी गुलदस्त्यात असलेल्या या भाऊ बहिणीचं स्वप्न नक्की काय आहे याचा उलगडा सुद्धा झाला आहे. भारतीयांचा सर्वात आवडता खेळ असलेल्या वर्ल्ड कपची मॅच खारीला बघायची आहे. तिचं हे स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी तिचं भाऊ काहीही करायला तयार आहे. अखेर त्यांचं हे स्वप्न कसं पूर्ण होईल ते या चित्रपटात पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना हा ट्रेलर पाहिल्यावर नक्कीच वाढेल.

दरम्यान या ट्रेलरमध्ये वेदश्री खाडिलकर म्हणजेच चित्रपटातील खारी आणि तिचा भाऊ आदर्श कदम म्हणजे चित्रपटातील बिस्कीट यांच्याव्यतिरिक्त आणखीही काही भूमिका उघड झाल्या. पोलिसांच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता संजय नार्वेकर, सुशांत शेलार आणि नंदिता पाटकर यांच्या देखील भूमिकांची झलक ट्रेलरमध्ये आहे.

खारीसारख्या बहिणीची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक बिस्कीटची गोष्ट. सादर आहे 'खारी बिस्कीट'चा ट्रेलर... असं म्हणून दिग्दर्शक संजय जाधव यांनी हा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आणला. संजय जाधव यांची 'खारी बिस्कीट' ही ५० वी कलाकृती येत्या १ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Powered By Sangraha 9.0