सलग दोन दिवस राहुल गांधी मारणार कोर्टाच्या फेऱ्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019
Total Views |


अहमदाबाद : आधीच पक्षनेतृत्व न सांभाळता आल्याने स्वतःच्याच पक्षातून टीकेचे धनी होत असलेल्या राहुल गांधी यांना आता सलग दोन दिवस न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. ही दोन्ही प्रकरणे मानहानीची आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अहमदाबाद जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अजय पटेल यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी दोन्ही खटले दाखल करण्यात आले होते.

 

'सर्व मोदी चोर आहेत,' असे वक्तव्य कर्नाटकातील कोलार निवडणूकीतील भाषणात केले होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी तक्रार केली होता. या प्रकरणी न्यायालयाने फौजदारी खटला दाखल झाला आहे. या प्रकरणाची सुनावणी १० ऑक्टोबर रोजी होणार होती. दरम्यान, दुसऱ्या खटल्यात राहुल गांधी यांनी अहमदाबाद जिल्हा सहकारी बॅंकेने नोटाबंदीवेळी जुन्या नोटा बदलून ७५० कोटींच्या नव्या नोटा बेकायदेशीर बदलल्याचा आरोप केला होता. बॅंकेचे अध्यक्ष अजय पटेल यांनी याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी राहुल गांधी जामीनावर आहेत. या खटल्याची सुनावणी ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@