मिनिटाला ६ पैसे : नेटीझन्सनी जिओला केले ट्रोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2019
Total Views |





मुंबई : जिओ युझर्सना गुरुवार, दि. १० ऑक्टोबरपासून कॉल करण्यासाठी प्रतिमिनिट सहा पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र, ग्राहकांनी जर जिओच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला तर त्यांना कॉलिंग सेवा मोफत राहणार आहे. दरम्यान, या बदलानंतर ग्राहकांनी आता याबद्दल सोशल मीडियावर टीकेचा भडीमार केला आहे.


 

सकाळपासूनच जिओला ट्रोल करणारे मेसेज आणि मिम्स व्हायरल होत आहेत. जिओ सेवा वापरणाऱ्यांनी आता बीएसएनएलचे पर्यायही इतरांना सुचवले आहेत. तसेच वॉडोफोन, आयडीया, एअरटेलसह इतर ग्राहकांनीही जिओ युझर्सची फिरकी घेण्याची संधी सोडली नाही.



 

जिओने इंटरकनेक्शन युझर्स चार्जेस म्हणजेच (IUC) हे टेलिकॉम ऑथोरिटी ऑफ इंड़ियातर्फे (ट्राय) जोपर्यंत शुन्य करण्यात येणार नाहीत तोपर्यंत हे शुल्क लागू करण्यात येणार असल्याची घोषणा जिओने केली. नव्या टॉपअप प्लानमध्ये जिओने १ ते १० जीबीपर्यंत फ्री इंटरनेट डेटा दिला आहे.





 
 

या कारणासाठी जिओकड़ून शुल्कआकारणी

इतर कंपन्यांन्यांच्या ग्राहकांकडून म्हणजेच इंटरकनेक्शन युझर्सकडून जिओच्या ग्राहकांना मिसकॉल्स येत असल्याचे निरिक्षण कंपनीने नोंदवले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याचा फटका आता ग्राहकांना बसला आहे.





@@AUTHORINFO_V1@@