९० व्या वर्धापन दिनानिमित्त 'जावा' ची विशेष आवृत्ती जाहीर

    दिनांक  10-Oct-2019 16:08:54फ्रँटीजेक जानेसेक यांनी १९२९ या वर्षी अगोदरच्या झेकोस्लोव्हाकियामध्ये जावा मोटारसायकल्सची स्थापना केली आणि जावा ५०० ओएचव्ही या जावा ब्रँडच्या पहिल्या मोटारसायकलची संकल्पना प्रत्यक्षात आणली. या घटनेचा ९० वा वर्धापनदिन साजरा करण्याच्या निमित्ताने क्लासिक लीजेन्डस् प्रायव्हेट लिमिटेड यांनी भारतात जावाची
९० वा वर्धापनदिन आवृत्तीआणली आहे.

जावा ड्युअल चॅनेल एबीएस प्रकारावर आधारित ही मोटारसायकल म्हणजे १९२९ मधील या ब्रँडच्या तेजस्वी आरंभाला आदरांजली आहे. ही आवृत्ती केवळ ९० मोटारसायकलींची असेल आणि त्यात ९० व्या वर्धापनदिन आवृत्तीसाठीची जावा ५०० ओएचव्ही च्या प्रेरणेतून निर्मित खास रंगसंगती असेल. प्रत्येक मोटारसायकलच्या इंधन टाकीवर ९० व्या वर्धापनदिनाचा संस्मरणीय लोगो आणि मोटारसायकलचा वैयक्तिक क्रमांक असेल.

नियमित जावा ड्युअल चॅनेल एबीएस मोटारसायकलच्या तुलनेत किमतीत काहीही बदल नसून ही नवी आवृत्ती नव्या लाल आणि हस्तिदंती रंगाच्या छ्टेमध्ये असून ती ताबडतोब वितरणासाठी उपलब्ध असेल.

मर्यादित आवृत्तीची आणि इतिहासाचा भाग असलेली ही मोटारसायकल जनतेला दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ पासून जावा विक्रेत्यांकडे बघायला मिळू शकेल. ज्या ग्राहकांनी या अगोदर जावा मॉडेलचे बुकिंग केले आहे आणि जे ग्राहक दिनांक २२ ऑक्टोबर २०१९ च्या मध्यरात्रीपूर्वी बुकिंग करतील त्यांना ही मोटारसायकल आपल्या मालकीची करता येईल. फक्त त्यांनी आपल्या जवळच्या विक्रेत्याकडे या मोटारसायकल सोडतीमध्ये आणि त्यातील वाटपामध्ये सामील होण्याचा आपला हेतू स्पष्ट करायचा आहे. जे ग्राहक या सोडतीद्वारे निवडले जाणार नाहीत ते आपोआप आपल्या मूळ मॉडेल बुकिंग यादीत परततील. एकदा मोटारसायकल सोडत पार पडली की मोटारसायकली ताबडतोब ग्राहकांनी नेमून दिलेल्या जागी पाठविल्या जातील.

मोटारसायकलीच्या तांत्रिक विवरणात काहीही बदल नाहीत. ही २९३ सीसी शक्तीची असून, द्रव शीत, एक सिलेंडर, आणि ट्यून केलेल्या डबल क्रॅडल चेसीस सोबत डीओएचसी इंजिनमुळे मिळणाऱ्या सुंदर प्रचालन आणि स्थिरता असल्यामुळे ही नवी जावा आधुनिक आणि उत्कृष्ट आहे. जावा आणि जावा फॉर्टी टू यांची किंमत अनुक्रमे भारतीय रु. १,६४,०००/- आणि भारतीय रु. १,५५,०००/- (एक्स शोरूम, दिल्ली) आणि ड्युअल चॅनेल एबीएस प्रकार यांची किंमत अनुक्रमे भारतीय रु. १,७२,९४२/- आणि भारतीय रु. १,६३,९४२/- इतकी असेल. या मोटारसायकल्सचे उत्पादन कंपनीच्या मध्य प्रदेशातील पीथमपूर येथील कारखान्यात केले जाते.

क्लासिक लीजेन्डस् प्रायव्हेट लिमिटेड संबंधी

क्लासिक लीजेन्डस् प्रायव्हेट लिमिटेड ही साधारण दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेली आणि दिमाखदार अशी प्रतिमा असलेला मोटारसायकल ब्रँड पुन्हा एकदा बाजारात आणणारी एक भारतीय कंपनी आहे. भारतातील पहिली वाहिली आणि एक खरीखुरी जीवनशैली कंपनी बनण्याचे क्लासिक लीजेन्डस् यांचे ध्येय असून ग्राहकांना क्लासिक ब्रँडची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी त्यांचे एक तजेलदार उत्पादन म्हणून सह-निर्मिती करणे आणि मोटारसायकल पर्यावरणाची सेवा देणारी ही कंपनी आहे.

जावा या मोटारसायकल ब्रँडला सध्याचे झेक प्रजासत्ताक आणि अगोदरच्या झेकोस्लोव्हाकियामधील ९० वर्षांचा वारसा असून आपल्या भरभराटीच्या काळात क्लासिक, उच्च तंत्रज्ञान असलेल्या आणि दणकट मोटारसायकलींची निर्मिती करून त्या १२० देशांमध्ये निर्यात केल्या जात असत. भारतीय बाजारात त्या प्रथम १९६० च्या सुरुवातीला आल्या. जावा मोटार सायकलींची वैशिष्ट्ये म्हणजे सुंदर डिझाईन आणि दणकट कामगिरी...त्यामुळे त्यांनी ग्राहकांची हृदयेही जिंकली आणि अनेक जागतिक पारितोषिकेही मिळवली.

त्यांच्या ब्रँड मधून क्लासिक लीजेन्डस् यांनी सध्या जावा हा ब्रँड पुन्हा फक्त ब्रँड म्हणून नव्हे तर जीवनशैली म्हणून जीवित केला आहे. क्लासिक लीजेन्डस् यांनी आपली भागीदारी क्षमता जागतिक अनुभवासह डिझाईन आणि तंत्रज्ञान यामध्ये लावली असून उत्पादने गुणसूत्र आणि गुणविशेष साध्य करतील अशा पद्धतीने मूळ जावा सादर करीत आहेत.