दीपिकाचा 'मेंटल हेल्थ डे' च्या निमित्ताने दिलेला मेसेज नक्की पहा

    दिनांक  10-Oct-2019 17:02:40


आज देशभर 'मेंटल हेल्थ डे' उत्साहाने साजरा होत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने मेंटल हेल्थ या विषयावर अनेक वेळा जनजागृती केली आहे. याविषयी अनेक ठिकाणी ती जागरूकता ठेण्यासाठी आवाहन देखील करते. त्यानुसार आज 'मेंटल हेल्थ डे' च्या निमित्ताने तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास मेसेज आपल्या चाहत्यांसांठी दिला आहे. त्याचबरोबर तिच्या आवडत्या कलेक्शन मधील काही गोष्टी प्रेक्षकांना या निमित्ताने विकत घेता येणार आहेत. आहे ना ही आनंदाची बातमी?


दीपिकाने आत्तापर्यंत तिच्या अनेक मुलाखतींमध्ये तिच्या करिअरच्या एका वळणावर आलेल्या डिप्रेशनसारख्या मानसिक समस्येचा उल्लेख केला आहे. त्यामधून तिने तिच्या आई बाबा आणि कुटुंबियांच्या साहाय्याने मार्ग काढला पण आयुष्यातील या अनुभवानंतर तिने अशा मानसिक समस्येतून जाणाऱ्या लोकांसाठी एक संस्था सुद्धा स्थापन केली.

अतिशय जलद गतीने चालणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीत खूप वेळा आपण आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याविषयी काळजी घेणे विसरून जातो. मात्र आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे किती गरजेचे याची जाणीव करून देणे हे 'मेंटल हेल्थ डे' चे उद्दिष्ट आहे.}