शिवसेनेत बंडाळी : दोनशे राजीनामे मातोश्रीवर

    दिनांक  01-Oct-2019 10:36:10नवी मुंबई : नवी मुंबई, ऐरोली आणि बेलापूर मतदार संघ भाजपसाठी राखून ठेवल्याचा फटका शिवसेनेला बसला आहे. या प्रभागातील दोनशे पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि इतर दोनशे कार्यकर्त्यांनी आपले राजीनाने मातोश्रीवर पाठवले आहेत. शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, विभागप्रमुखांनीही आपले राजीनाने पक्षश्रेष्ठींकडे सोपवले आहेत.

 

विधानसभा निवडणूकांनंतर तीन महिन्यांनी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्यामुळे या भागांत युतीचा फटका शिवसेनेला बसू शकतो, असा दावा शिवसैनेकांनी केला आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बंडाळी थोपवण्याचे मोठे आव्हान आहे.